-
☰
महाराष्ट्र: मुरबाड में कुणबी समाज का गुणगौरव एवं सम्मान समारोह हुआ संपन्न
- Photo by : social media
विस्तार
महाराष्ट्र: समाजबांधवांमध्ये एकजूट निर्माण करण्यासोबतच गुणवंतांना व्यासपीठ मिळावे, या उद्देशाने मुरबाड तालुका कुणबी समाजोन्नती मंडळाच्या वतीने ‘गुणगौरव व सन्मान सोहळ्या’चे आयोजन करण्यात आले। ‘संघ हीच शक्ती’ हा संदेश देत आयोजित करण्यात आलेल्या या सोहळ्याला समाजबांधवांचा मोठा प्रतिसाद मिळाला। कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने झाली। यावेळी विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या गुणवंत विद्यार्थ्यांसह सामाजिक कार्यकर्ते आणि ज्येष्ठ नागरिकांचा सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात आला। सोहळ्यात पत्रकारांचा विशेष सन्मान करण्यात आला। सामाजिक जनजागृती आणि समाजातील विविध प्रश्न, उपक्रम व प्रगती जनतेपर्यंत पोहोचविणाऱ्या पत्रकारांना शाल, श्रीफळ आणि सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले। कार्यक्रमाला कुणबी समाजातील विविध राजकीय, सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवर, पदाधिकारी तसेच समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते। यावेळी समाज संघटित राहिल्यासच प्रगतीची दारे खुली होतील, असा संदेश देण्यात आला। भावी पिढीच्या उज्ज्वल भविष्यासाठी सर्वांनी एकत्रितपणे काम करण्याचे आवाहनही करण्यात आले। फुलांची आकर्षक सजावट आणि शिस्तबद्ध नियोजनामुळे सोहळा विशेष लक्षवेधी ठरला। कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी मंडळाचे आजी-माजी पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले। कार्यक्रमाच्या समारोपाला राष्ट्रगीतानंतर महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले। या सोहळ्याला उपस्थित राहिलेल्या समाजबांधव, नागरिक, गुणवंत विद्यार्थी, पालक, पत्रकार तसेच मंडळाचे सदस्य आणि कार्यकर्त्यांचे आयोजकांच्या वतीने आभार मानण्यात आले।
उत्तर प्रदेश: शराब की लत के बीच महिला ने फांसी लगाकर दी जान, घरेलू विवाद के बाद उठाया कदम
उत्तर प्रदेश: महोबा में हुआ भव्य कजली मेला जुलूस, झांकियों और हाथी-घोड़ों ने बढ़ाई शोभा
झारखण्ड: ईद मिलादुन्नबी पर निकला जुलूस, सुन्नी हनफी एजुकेशनल ट्रस्ट ने दिया अमन और भाईचारे का संदेश
उत्तर प्रदेश: रक्षाबंधन के बाद हुआ बड़ा हादसा, डिवाइडर से टकराई बाइक, जीजा-साले हुए गंभीर रूप से घायल
उत्तर प्रदेश: रक्षाबंधन पर कच्ची दीवार बनी काल, मलबे में दबकर पांच साल के बच्चे की हुई मौत